Monday, August 9, 2010

"शिवचरित्रातून दादोजी कोडदेव हटवा"

दादोजी कोंडदेव हा शिवरायांचा गुरु किंवा मार्गदर्शक असल्याचा कुठलाही पुरावा मराठ्यांच्या इतिहासात सापडत नाही. तरीही काही इतिहासकारांनी दादोजी चे उदात्तीकरण करण्यासाठी त्याला शिवइतिहासात स्थान दिले, त्यातून विकृत इतिहास निर्माण केला गेला तो खोडून काढण्यासाठी सध्या मोठी जनजागृति सुरु आहे,सोलापुर येथील शिवस्मारकातील दादोजी चे उदात्तीकरण करणारी शिल्पे फोडून शिवप्रेमिंनी ता प्रकरणाला चळवलिचे स्वरुप दिले आहे,पुण्यातील लालमहालातून दादोजी हटवन्यासाठी ८० पेक्षा अधिक संघटनांनी आंदोलन सुरु केले आहे, त्याच प्रमाणे दादोजी कोडदेव कोण होता ? याचे ऐतिहासिक पुराव्यानुसार विश्लेषण सुरु आहे.


"शिवचरित्रातून दादोजी कोडदेव हटवा" हे पुस्तक प्रवीण गायकवाड यांनी संपादित केले आहे.त्यात श्रीमंत शिवाजी कोकाटे, चंद्रशेखर शिखरे,प्रवीण गायकवाड, अनंत दारवटकर ,जगजीवन काले,महेश म्हात्रे यांचे लेख तसेच शिवाजी महाराजांचे वंशज छत्रपती उदयनराजे भोसले यांचे आवाहन तसेच पुणे महानगर पालिका आणि महाराष्ट्र शासन यांच्यातील पत्रव्यवहार यांचा समावेश आहे,

अधिक माहितीसाठी वाचा -

"शिवचरित्रातून दादोजी कोडदेव हटवा",
संपादन- प्रवीण गायकवाड.
प्रकाशक-किशोर कडू.
जिजाई प्रकाशन, नारायण पेठ, पुणे.
पृष्ट ५४. मूल्य-२० रुपये.